Ad will apear here
Next
देवाची खुर्ची!


‘राजकमल कला मंदिर’ किंवा फिल्म इन्स्टिट्यूटमधला ‘प्रभात’चा १ नंबरचा स्टुडिओ. इथे आत प्रवेश करताना अनाहूतपणे दरवाज्यातच जमिनीवरची माती कपाळाला लावली जाते. त्याला वेगळी आठवण ठेवावी लागत नाही. २००२ साली ‘राजकमल’मध्ये मराठीतल्या पहिल्या सराउंड साउंड ५.१ चित्रपटाचं - ‘चिमणी पाखरं’चं मिक्सिंग हितेन घोष यांच्याबरोबर करायची संधी मला महेशजींच्या मुळे मिळाली! त्यानंतर ‘खबरदार,’ पछाडलेला’पर्यंत अनेक चित्रांच्या मिक्सिंगसाठी तिथे जायचा योग आला. 

शांतारामबापू, मंगेश देसाई जिथे काम करायचे तिथेच - त्याच मिक्सिंग थिएटरमध्ये आपल्यालाही काम करायला मिळतंय, ह्या विचारानेच मी हवेत उडत असायचो. ती जागा म्हणजे माझ्यासाठी खरोखर मंदिरच आहे. मंगेश देसाईंचेच शिष्य हितेन घोष यांच्या शेजारच्या खुर्चीत बसून ती प्रोसेस अनुभवणं हा माझ्यासाठी जगातला एक अत्युच्च आनंदाचा भाग होता. एक प्रसंग कधीही विसरू शकणार नाही असा. 

‘चिमणी पाखरं’चं पहिलं रीळ मिक्स झालं. मराठीतल्या पहिल्या सराउंड साउंड चित्रपटाचं पहिलं रीळ! तिथे हितेनदा, त्यांचा एक असिस्टंट आणि मी असे तिघेच होतो. हितेनदा मला म्हणाले, ‘जा, मागे जाऊन बस आणि ऐक.’ मी अंधारातच मागे साधारण मधल्या खुर्चीत जाऊन बसलो! मिक्सिंग अप्रतिमच झालं होतं! 

मराठी चित्रांच्या नवीन पर्वाच्या पहिल्या क्षणाचा मी साक्षीदार होतो! तो क्षण मी अनुभवला होता! रीळ संपलं! दिवे लागले. अति आनंदानीसुद्धा माणूस सुन्न होऊ शकतो. तसा सुन्न होऊन मी तिथेच बसलो होतो. अचानक लक्षात आलं, की मी बसलोय ती खुर्ची इतर खुर्च्यांपेक्षा थोडी विशेष आहे. थोडी मोठी, थोडं जास्त पॅडिंग असलेली, जरा जास्त आरामशीर! 

मी हितेनदांना विचारलं, की ही एकच खुर्ची अशी का? ते म्हणाले, की ‘वो अन्नासाब की कुर्सी है.’ मी १००० व्होल्टचा शॉक बसल्यासारखा तिथून उठलोच. पुढे अनेक वेळा तिथे मिक्सिंग केलं; पण जाणीवपूर्वक लक्ष ठेवून पुन्हा तिथे बसायची हिंमत कधीही केली नाही! देवाची खुर्ची ती!

- संजय दाबके
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/OVIUCT
Similar Posts
बिटवीन द लाइन्स चंद्रमोहन कुलकर्णी या कलाकाराची कला गेली कित्येक वर्षे मी जवळून बघतोय. त्या निर्मितीच्या बाबतीत मला खूप कुतूहलही नेहमीच असतं. त्याचं कुठलंही चित्र इतकं नैसर्गिक कंपोझिशन, रेषा, रंग घेऊन कसं अवतरतं? ‘बिटवीन द लाइन्स’ या पुस्तकातून चंद्रमोहनने माझ्यासारख्या त्याच्या कलेच्या बऱ्याच चाहत्यांच्या उत्सुकतेला
कोचीनचा सर्वोत्कृष्ट विमानतळ काल कोचीनला होतो. पहिल्यांदाच तिथे गेलो होतो. भारतातल्या बहुतेक विमानतळांवर (अगदी छोट्यासुद्धा) आतापर्यंत प्रवास झाला आहे. सगळे विमानतळ हे एकाच साच्यातले आहेत. तशाच गोल शेड्स आणि काचेचे स्ट्रक्चर. तशाच लिफ्ट्स, तसेच एस्केलेटर, तशीच रंगसंगती. हल्ली विमानतळाचे बरेचसे भाग प्री-फॅब्रिकेटेड मिळत असणार, म्हणून जगभरचे विमानतळ एकसारखेच दिसतात
‘हास्यरेषांचा आनंदयात्री’ २९ जुलै हा हास्यचित्रकार शि. द. फडणीस यांचा जन्मदिन. त्या निमित्ताने, प्रख्यात प्रकाशचित्रकार सतीश पाकणीकर यांचा हा लेख...
वेरूळ येथील कैलास मंदिराची एक नाही, तर दोन आश्चर्ये!! वेरूळ येथील आठव्या शतकातील, हे एकाच प्रचंड खडकातून वरून खाली खणत आणलेले कैलास मंदिर (लेणे), हे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीतील एक आश्चर्य आहेच... पण त्या मंदिराचे, त्याशिवाय अजूनही एक आश्चर्य आहे, ते म्हणजे, ते मंदिर घडवताना निघालेल्या तब्बल ४० कोटी किलोग्रॅम (!!!) दगडाचे पुढे काय झाले, हे कोणालाच माहिती नाही

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language